Thursday, July 18, 2019

सोशल मिडिया आणि ट्रॅव्हल प्लॅनिंग - 1

सोशल मिडिया आणि ट्रॅव्हल प्लॅनिंग 🏖️😍

तुमच्यापैकी कित्येक जणी सोशल मिडिया अगदी छान वापरता. नुसतंच टाईमपास साठी नाही तर स्वतःची कितीतरी कामं चुटकीसरशी करण्यासाठी किंवा इतरांना मदत करण्यासाठी.
सोशल मिडिया वाईट असतो वैगेरे मतं बाळगणारा वर्ग हळूहळू कमी होतोय आणि त्या ऐवजी त्याचा स्मार्ट आणि सकारात्मक पद्धतीने वापर करणारा वर्ग वाढतोय.

तर सोशल मिडिया च्या अश्याच एका पैलू वर मी काही माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे.
मी. fb वर रोज कितीतरी पोस्ट्स पाहते ज्यात तुम्ही ट्रॅव्हल एजंट किंवा ट्रॅव्हल पॅकेज, ग्रुप टुर ऑर्गनायझर इत्यादीं बद्दल प्रश्न विचारता. पण या गोष्टींसाठी सोशल मीडिया वापरताना तुम्ही कधी हा विचार केलात का की हाच सोशल मिडिया "सेल्फ ट्रॅव्हल प्लॅनिंग" अर्थात स्वतः च स्वतः ची ट्रीप प्लॅन करण्यासाठी कसा वापरता येईल?

खर तर अगदी सोप्पं आहे.

मी स्वतः अगदी हौशी ट्रवेलेर / बॅकपॅकर आहे आणि अगदी पहिल्यापासून मला माझ्या ट्रीप स्वतःच्या स्वतः प्लॅन करायला प्रचंड आवडतात. आजवरच्या माझ्या सगळ्याच ट्रीप मधे सोशल मिडिया अगदी माझ्या प्रायव्हेट ट्रॅव्हल एजंट सारखा मला उपयोगी पडला आहे. तोही अगदी फुकट.


कसा? चला बघुया सोशल मिडिया ची काही कूल फीचर्स

१. ट्रॅव्हल ग्रुप्स - फेसबुक वर अक्षरशः हजारो ट्रॅव्हल ग्रुप्स आहेत. महाबळेश्वर पासून ते युरोप पर्यंत कुठेही जायचं असेल तर तुम्हाला फक्त योग्य ग्रुप मधे योग्य प्रश्न विचारायचे आहेत. काही क्षणांतच तुम्हाला तुमची उत्तरं मिळतील. अमुक महिन्यात हवामान कसं असेल? तमुक ठिकाणची ऑफबीट ठिकाणं कोणती? एखाद्या ठिकाणी पोहचण्याचा सर्वात सोप्पा आणि स्वस्तात स्वस्त मार्ग कोणता? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी काही मिनिटांत तुम्हाला इथे मिळू शकतात. ते ही तिथे स्वतः जाऊन आलेल्या पर्यटकांकडून किंवा खुद्द तिथल्या स्थानिकांकडून सुद्धा.

२. फेसबुक इव्हेंट आणि मीट अपस
एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर फक्त टुरिस्ट प्लेसेस पाहण्यापेक्षा एखादा लोकल सण तिथल्या लोकल लोकांसोबत साजरा करता आला तर? किंवा एखाद्या शहरातील समविचारी ट्रवेलेरसनी एकत्र भेटून गप्पांचा फड रंगवला तर? छान वाटते ना आयडिया? तर अश्या बऱ्याच इव्हेंट आपल्या आजूबाजूला होत असतात. मिड नाईट सायकलिंग पासून होळी सेलिब्रेशन पर्यंत.. ट्रेकिंग पासून ते म्युझिक फेस्टिवल पर्यंत हजारो फ्री/ पेड इव्हेंट चे दरवाजे सोशल मिडिया ने किती सहज पणे आपल्यासाठी उघडे केलेत.

३. रेकमेंडेशनस - ग्रुप्स आणि इव्हेंट चेक करून कुठे जायचं हे तर ठरलं पण मग तिथे जाऊन राहायचं कुठे? खवय्यांनी काय काय नवीन ट्राय करायचं? शोपहोलिक नी कुठे कुठे डाका घालायचा? या सगळ्या गोष्टींसाठी फेसबुक ने रेकमेंडेशनस नावाचं फीचर सुरू केलंय. तुम्ही कुठलीही पोस्ट टाकताना त्यात recommendation, looking for असे शब्द वापरले आणि तुम्हाला जिथे जायचयं त्या ठिकाणचं नाव टाकलं की तुमच्या पोस्ट सोबत एक मॅप आपोआप जोडला जातो आणि प्रश्न वाचणाऱ्या ला चटकन समजत की तुम्ही कुठल्या जागे विषयी प्रश्न विचारत आहात.

४. चेक - इन - आजकाल आपण कुठेही जाताना हमखास चेक- इन टाकतोच, थोडासा शो ऑफ चालतो, हो ना? पण तुम्हाला माहीत आहे का की शो ऑफ शिवाय सुद्धा हे चेक इन फीचर किती कामाचं आहे ते? पहिली गोष्ट म्हणजे योगायोगाने अगदी अचानक एखादा मित्र किंवा मैत्रीण लास्ट मिनिट ट्रॅव्हल पार्टनर म्हणून भेटू शकतो.
दुसरा आणि महत्वाचा उपयोग म्हणजे इतर लोकांच्या जुन्या चेक इन वरून तुम्हाला हे समजतं की आपल्या ओळखीचं, फ्रेंडलीस्ट मधलं, विश्वासू माणूस  एखाद्या ठिकाणी जाऊन आलय. एखाद्या "याची देही याची डोळा" ती जागा फिरलेल्या विश्वासू व्यक्ती कडून त्या जागेची माहिती मिळणं म्हणजे सोन्याहून पिवळ, नाही का?

५. हॅशटॅग # - आता हॅशटॅग बद्दल मला वेगळं काही सांगायची गरज च नाही. आपल्या पैकी प्रत्येक जण हॅशटॅग वापरण्यात अगदी सराईत आहे.  तर आता या बाकी फीचर्स पैकी नक्की कोणता फीचर वापरायचं हे समजत नाहीये कारण तुमचं नक्की कुठे जायचं आणि काय करायचं हेच ठरलं नाहीये. मग हे ठरवण्यासाठी जी माहिती हवीय तिच्याशी रीलेटेड एखादा शब्द हॅशटॅग वापरून सर्च करा आणि voilà! माहितीचा अगडबंब खजाना तुमच्यापुढे उघडला जाईल. तुमच्या आवडत्या डेस्टिनेशनस बद्दल असेल नसेल तेवढी सगळी माहिती तुमच्यासमोर हजर. अगदी काही सेकंदात!

मग? करताय ना तुमची नेक्स्ट ट्रीप प्लॅन? नक्की करा आणि तुमचे अनुभव शेअर करा.

ता. क. 
ट्रॅव्हल साठी सोशल मिडिया वापरताना काय काळजी घ्यावी? मी माझ्या ट्रीप कश्या आणि कुठे प्लॅन केल्या? कोणत्या websites आणि अॅपस यूज करायचे? बजेट ट्रीप कशी प्लॅन करायची? कोणते फेसबुक ग्रुप्स ट्रॅव्हल प्लॅनिंग साठी बेस्ट आहेत? 
या आणि अश्या प्रश्नांसाठी मी अजून एखादी पोस्ट लिहायचा विचार करतेय, तर मला नक्की सांगा तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल.


traveling वर ही माझी पहिलीच पोस्ट आहे. शुद्धलेखनाच्या भयंकर चुका आहेत कारण शाळे नंतर बऱ्याच दिवसांनी मराठी लिहायचा प्रपंच केला. माफी असावी.  

©श्रद्धा कदम

No comments:

Post a Comment