हॅलो travelers!
मागच्या आठवड्यात मी सोशल मीडिया आणि
ट्रॅव्हल प्लॅनिंग या विषयावर एक पोस्ट टाकली होती.
सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी इतका भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनापासून आभार.
तुमच्या प्रेमा मुळे मला अजुन लिहिण्यासाठी खूप खूप इंस्पिरेशन मिळाली.
तर बऱ्याच जणींनी मला अजून माहिती वाचायला आवडेल असं सांगितलं. माझ्या समोर तसे भरपूर विषय होते ज्यावर मी तासन् तास लिहू शकते पण विचार केला की सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याला हात घालूया.
तर आजचा विषय हा आहे की

"ट्रॅव्हल प्लॅनिंग साठी सर्वात विश्वसनीय आणि माझे पर्सनल फेवरेट fb ग्रुप्स/ वेबसाईटस / अॅप्स कोणते ?"🛵
️
आता ही सगळी माहिती देण्यास आधी मला एक महत्वाची गोष्ट आवर्जून सांगायची आहे की सेल्फ प्लॅनिंग मधे तुमचे पैसे वाचतात आणि स्वतः ट्रीप प्लॅन करण्यात जी मजा आहे ती काही औरच.
पण हे सगळं करताना तुम्हाला सगळं रेडीमेड आणि आयतं नाही मिळणार बरं का! थोडी मेहनत तुम्हाला ही घ्यावी लागेल. थोडा वेळ काढून थोडा अभ्यास तुम्हाला ही करावा लागेल.
एखाद्या नवीन, अनोळख्या ठिकाणची ट्रीप घरात बसून प्लॅन करताना अगदी थोडीशी का होईना रिस्क ही असतेच. आपल्याला त्या नवीन ठिकाणचा नेमका अंदाज नसतो. हवामान, चालीरीती, भाषा, करंसी, वाहतूक, माणसं सगळंच अपेक्षपेक्षा थोडं वेगळं असू शकतं. तर थोडीशी मेहनत आणि थोड्याशा अडवेंचर ची तयारी असेल तर अगदी सहजपणे तुम्ही तुमची ट्रीप प्लॅन करू शकता.

आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती फक्त टूल्स बद्दल, जसं की अॅप / वेबसाईट/ एफबी ग्रुप्स इत्यादी पण त्यांचा किती आणि कसा वापर करायचा हे ज्याचं त्यानं आपल्या सोईनुसार ठरवायचं.
या विषयाचा आवाका तसा बराच मोठा आहे पण मी शक्य तितकं थोडक्यात आटोपत घ्यायचा प्रयत्न करणार आहे.
यातल्या प्रत्येक टूल बद्दल खरतर एक एक अख्खी पोस्ट लिहीत येईल. पण तुम्ही सगळ्याजणी बेसिक माहितीच्या आधाराने आरामात पुढचं सगळं explore करू शकता.

आता मी काही कॅटेगोरीज नुसार हे टूल्स अरेंज केलेत :
१. ट्रान्सपोर्ट आणि हॉटेल बुकींग :
️
agoda.com (हॉटेल), booking.com (हॉटेल), makemytrip.com (फ्लाईट), आयटीसीटीसी अॅप (ट्रेन), रेडबस आणि पे टी एम (बस तिकीट)
खरतर हॉटेल बुकिंग साठी मी अगोडा आणि बुकिंग.कॉम च प्रेफर करते कारण ते वापरायला पण सोप्पे आहेत आणि किंमत पण बरीच कमी असते. पण ट्रान्सपोर्ट साठी मी दोन तीन वेगवेगळ्या साईट्स चेक करते कारण सतत कुठेना कुठे काही ऑफर्स चालू असतात. त्यातल्या त्यात जिथे स्वस्त मिळेल तिथे मी बुक करते. कित्येकदा एखद्या एअरलाइन्स च्या वेबसाईट वर सुद्धा ऑफर्स मिळून जातात.
थोड्या हटके आणि बुटिक स्टे ऑप्शन्स साठी एअर बी एन बी (Airbnb.com app and website)सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. यावर तुम्हाला टीपिकल हॉटेल्स व्यतिरिक्त कितीतरी युनिक स्टे ऑप्शन्स मिळतील जसं की बबल हॉटेल किंवा एखादं केव हाऊस ( मी काही फोटोज् attach केलेत या पोस्ट्स सोबत त्यात Airbnb लिहिलेले फोटोज् हे actual खरेखुरे Airbnb स्टे ऑप्शन्स आहेत जे पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल )
या व्यतिरिक्त काऊच सर्फिंग आणि हॉस्टेल या विषयावर तर एक वेगळी पोस्ट होऊ शकते. पण सध्या येवढं लक्षात घ्या की अगदी लो बजेट सोलो, कपल किंवा ग्रुप बॅकपॅकर्स साठी हे अतिशय उत्तम पर्याय आहेत.
अतिशय कमीत कमी बजेट मधे पाठ टेकायला आणि आंघोळी पूर्त्या रूम्स, डॉरमीटरीज (dorms) इथं हॉस्टेल मध्ये मिळतात.
आणि काउच सर्फिग मधे तुम्ही इतरांच्या घरी पाहुणे म्हणून राहू शकता किंवा इतर ट्रवेलरस ना तुमच्या घरी होस्ट करू शकता.
थोडासा सिक्स्थ सेन्स आणि गट फिलिंग वापरून अतिशय सुरक्षित पद्धतीने काउच सर्फींग करता येऊ शकते. हे दोन्ही पर्याय फॅमिली ट्रीप साठी फारसे सोयीचे नसले तरी हॉटेल्स पेक्षा काही कमी नाहीयेत बर का! काही फोटोज् टाकतेय पोस्ट मधे. तुम्ही नक्की प्रेमात पडाल.

२. एफबी ग्रुप्स :

मी काही फुल्ल टाईम ट्रवेलर नाही त्यामुळे खूप जास्त फिरले नाही ये. पण आत्ता पर्यंत जेवढं फिरले आहे त्यासाठी जे ग्रुप्स यूज केलेत ते मी खाली देतेय
भारत भ्रमण (बजेट ट्रॅव्हल) : backpacking and budget traveling India
बजेट ट्रेक : youth hostels India
केरळ : sanchari travel forum
हिमाचल : the Himalayan club
युरोप : backpacking Europe
बाली : backpackers Bali
जग भ्रमंती : must do travels
पाकिस्तान : the karakoram club
आता पाकिस्तान वाचुन कित्येकांच्या कपाळा वर आठ्या आल्या असतील. पण बाकी सगळं विसरून फक्त हे पेज चेक करा. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच का असा म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. दुर्देवाने भारतीयांना या स्वर्गातल्या बहुतेक ठिकाणी प्रवेश बंद आहे. सो आपल्याला फक्त फोटोज् आणि व्हिडिओज बघूनच समाधान मानावं लागेल.

३. वेबसाईटस :
ट्रीपअॅडवायजर (TripAdvisor)
ट्रायपोटो (tripoto)
ट्रॅव्हल ट्राईंगल (travel triangle)
ट्रायपोटो (tripoto)
ट्रॅव्हल ट्राईंगल (travel triangle)
या वेबसाईट किंवा यांचे अप्स वापरून मी आयटनररी (itinerary) किंवा हॉटेल्स/ लोकेशन रिव्ह्यूज (reviews) वाचते आणि माझी ट्रीप प्लॅन करण्यासाठी या माहितीचा उपयोग करते.
ट्रीपअॅडवायजर वापरताना एक काळजी घ्या, हॉटेल्स चे रिव्ह्यू जरी ५ स्टार असले तरी त्याचे अॅक्च्युअल फोटोज् बघा कारण काही हॉटेल्स आणि लोकेशन्स हे बॅकपॅकर साठी खूप छान असतात त्यामुळे बॅकपॅकरस त्या जागेला ५ स्टार देऊ शकतात पण ती सेम जागा लहान मुलांसाठी अजिबात सूटेबल नसते तेव्हा बुकिंग करण्याआधी त्या हॉटेल चे डिटेल्स नक्की वाचा.
ट्रायपोटो वर तुम्हाला इतर ट्रॅव्हलरसनी लिहिलेली छोटी छोटी प्रवास वर्णन वाचता येतील. तुमच्या आमच्या सारख्या ट्रॅव्हलरसनी अगदी हलक्या फुलक्या भाषेत आणि मुद्देसूदपणे लिहिलेली ही प्रवास वर्णन खूप माहिती अगदी सहजपणे उपलब्ध करून देतात. एक एका डेस्टिनेशन साठी वेगवेगळे ब्लॉग्स शोधण्यापेक्षा एकाच ठिकाणी हव्या त्या डेस्टिनेशन चा ब्लॉग तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
ट्रॅव्हल ट्राईंगल वर मी फक्त आयटनररी चेक करते कारण ही केसरी वैगेरे सारखी कमर्शियल पॅकेज टूर्स विकणारी कंपनी आहे.

४. माझे पर्सनल फेवरेट यूट्यूब चॅनल्स :
Lost LeBlanc, Carlos Costa (English)
Lost LeBlanc, Carlos Costa (English)
Traveling Desi (Hindi) : मी या माणसाची जबरदस्त फॅन आहे. ज्या पद्धतीने तो एखादं ठिकाण दाखवतो ना अगदी तिथे जाऊन आल्यासारखं वाटतं (+ पॉइंट म्हणजे हा बजेट फॉरेन ट्रीप वर व्ही लॉग टाकतो)
रानवाटा , उर्मिला निंबाळकर (मराठी)
५. माझे पर्सनल फेवरेट इंस्टग्रॅम हॅण्डलस :
इंस्टग्रॅम वर ट्रॅव्हल प्लॅनिंग साठी सगळ्यात जास्त वापर मी हॅशटॅग चाच करते. तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही फक्त इंस्टग्रॅम अकाऊंटच नाही तर हॅशटॅग ला सुद्धा फॉलो करू शकता? जसं की मला हिमाचल प्रचंड आवडतं आणि मला सतत तिथल्या नवीन नवीन गोष्टी वाचायला, पहायला आवडतात. सो एकाच माणसाला फॉलो करण्यापेक्षा जे जे लोकं हिमालया बद्दल पोस्ट करतात त्या त्या सगळ्या पोस्ट्स मला पहायच्या असतील तर मी #Himalayas फॉलो करते.
ट्रॅव्हल प्लॅनिंग पेक्षा वेगवेगळे सुंदर सुंदर फोटोज् आणि व्हिडिओज पाहून ड्रीम डेस्टिनेशन ची बकेट लिस्ट बनवण्यासाठी इंस्टग्रॅम सारखी दुसरी जागा नाही

आता पुढचा जो मुद्दा आहे तो प्रत्यक्ष ट्रवेलिंग शी निगडित नाहीए पण तुम्हाला वाचायला नक्कीच आवडेल
६. ट्रॅव्हल मूव्हिज :
फिरायला जाण्या साठी ईनफ inspiration मिळत नाहीए ? पॉपकॉर्न घ्या, तंगड्या पसरा आणि हे मूव्हिज बघायला घ्या
जिंदगी ना मीलेगी दोबरा
दिल चाहता है
पासपोर्ट टू पॅरिस
इंटू द वाइल्ड
द मोटरसायकल डायरीज
हायवे
इट प्रे लव्ह
बीफोर सनराईज (पुढचे दोन पार्टस - बीफोर सनसेट, बीफोर मिड नाईट)
द ट्रीप ( वेब सीरिज - युट्यूब)
चले थे साथ (पाकिस्तानी मूव्ही)
शेफ (chef)
कल्कीज ग्रेट एस्केप (टीवी शो)
ट्रॅव्हल एक्सपी (टीवी चॅनल)

नाही नाही म्हणता म्हणता बरीच लांबली ना पोस्ट? आता आवरतं घेते.
तुमचे अभिप्राय नक्की कळवा. अजून काही जाणून घ्यायला आवडेल? पोस्ट मधे काय सुधारणा करता येतील? मला नक्की सांगा

ता.क. मी आधीच लिहिल्या प्रमाणे मी काही फुल्ल टाईम ट्रॅव्हलर किंवा प्रोफेशनल ट्रॅव्हल एजंट नाही. सो याहून चांगल्या आणि उपयुक्त गोष्टी इंटरनेट वर असू शकतात. मी हौस म्हणून फिरते आणि ते करताना जे काही शिकले त्याचा उपयोग माझ्यासारख्या इतर हौशी मंडळींना व्हावा त्यासाठीच हा लेखन प्रपंच.
©श्रद्धा कदम

.jpg)