Saturday, March 5, 2016

Happy Birthday Little Sister

Dear Pooju,

आज तुझा वाढदिवस. दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत तुझं गिफ्ट डीसाईड नाही केलय मी. या वर्षी तुझ्या वाढदिवसासाठी काहीतरी स्पेशल करायचा विचार आहे, त्याची पहिली इन्सटाउलमेंट म्हणून हा ब्लॉग.
खरतरं लिहायला बसले तेव्हा विचार नव्हता केला काय लिहायचं, पण आता लिहिता लिहिता सुचतंय बरंच आणि सुचेल तसा लिहित जातेय मी.
आपल्या छोट्याश्या परिवारात आपण इन मीन तीन भावंड होतो. आणि जेव्हापासून मला आठवतंय तेव्हापासून तूच माझी सर्वात जवळची मैत्रीण होतीस आणि अजूनही आहेस. कित्येक सुंदर क्षण आपण एकत्र साजरे केले. मागच्या २२ वर्षात किती आठवणी जमल्या आहेत आपल्याजवळ.
आपली सगळ्यात जुनी आठवण आहे ती सायन च्या किल्ल्यावरची. त्या धबधब्या सारख्या ठिकाणी किती खेळायचो आपण. त्यानंतर भक्ती पार्क आलं. तिकडच्या पार्क मध्ये तासन तास उड्या मारायचो. किती निरागस होते ना  ते दिवस?
हळू हळू ते निरागस बालपण संपत गेलं आणि आपण दोघीही मोठ्या होत गेलो. आपली कॉलेज लाइफ सुरु झाली. मनमोकळ्या निरागस हसण्याची आणि एकत्र हुंदडण्याची जागा आता गच्चीवर शेअर केलेल्या सीक्रेटसनी घेतली. आठवतात तुला त्या न संपणाऱ्या गप्पा, रात्री चमचमणारा इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, background ला मंद मंद चालणारी आपली दोघींची फेवरेट प्लेलीस्ट. छोट्याश्या बजेट मध्ये केलेल्या मोठ्या मोठ्या shoppings ची सर तर आत्ताच्या हजारोंच्या खरेदीला सुद्धा नाही येणार.
इंजिनीअरिंग ला आल्यावर हळूहळू गप्पा सिरिअस होत गेल्या. तू आमच्यासोबत इकडे राहायला आलीस आणि माझी जिवलग मैत्रीण माझ्या आणखी जवळ आली. ती तीन वर्षं खूप सुंदर होती. मला जॉब लागल्यावर मी ३ महिने पुण्याला गेले तेवढाच काय तो दुरावा. आर्थिक स्वातंत्र्य आल्यावर आपण बऱ्याच नवीन गोष्टी आजमावल्या. एखादा छानसा हॉटेल असो कि थिएटर मध्ये पहिला ३-D मुव्ही असो मला सगळीकडे तूच लागयचीस .
तुझं इंजिनीअरिंग संपली  आणि तू पुन्हा सायन ला गेलीस. माझी एक खूप जवळची मैत्रीण दूर गेली.
त्यांनतर पण आपण भेटायचो, पण पहिल्या इतका नाही. मध्यंतरी केरळ च्या ट्रीप मध्ये ७ दिवस एकत्र होतो तितकंच .
हळू हळू भेटणं . . .  गप्पा. . . कमी होत गेल्या, शेअरिंग संपत गेलं. का आणि कसं याचा कूट घालण्याची ही जागा नाही पण तू दूर जातेयस हे भावना खूप त्रासदायक होती. तू माझी बेस्ट फ्रेंड होतीस. तुला गमावून चालणार नव्हता. मला तू नेहमी माझ्या सोबत हवी होतीस. बोचणाऱ्या अबोल्याचा हा काळ खूप पेनफुल होता.
नंतर हा ही patch  गेला. खूप वेळ घेऊन, संवाद साधून आणि प्रसंगी भांडून आपण आज पुन्हा एकत्र आहोत. अगदी पाहिल्यासारखं. आपलं नातं आता  पहिल्याहून अधिक घट्ट आणि समजूतदार झालंय .
पण तुला माहिती आहे, या मधल्या patch मध्ये मला जाणवलं कि तू आता मोठी झालीय्स. आपल्या भांडनान्मधून समजलं कि तुझे विचार स्वतंत्र होतायत, तू आता मला blindly फौलो करणारी छोटी पुजू नाही राहिलीस. तूला  आता तुझे स्वतः चे विचार आहेत. ध्येय्य आहेत . तुला असा मोठा होताना, माच्युअर होताना बघण्यात खूप आनंद वाटतोय मला. आणि trust  me, आई वडीलां इतका नसेल पण त्याहून थोडा कमी अभिमान वाटतो तुला असा सुंदर आणि मोठा होताना बघताना. अशीच उत्तरोत्तर तुझी प्रगती होताना पहायचं मला.

जग खूप सुंदर आहे पुजू, फक्त चांगल बघायला शीक. माफ करायला शीक.  तुला परतून सगळा चांगलच मिळेल. इथून पुढे तुझ्या साठी जे जे सुंदर आणि सर्वोत्तम आहे ते ते सगळा तुला मिळो या शुभेच्छा.

पुन्हा एकदा many many many happy returns of the day sweetheart.
You are the best sister in the world and my best friend.
Love you little sister.

तुझीच,
अजूनही मोठी न झालेली दीदी :p





No comments:

Post a Comment